शहीद दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वपूर्ण दिवस. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो-लाखों भारतीयांनी प्राणांची आहुती दिली. २३ मार्च 1931 ला भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना फासीवर लटकवण्यात आले. हेच ते तीन क्रांतिकारक होते ज्यांनी इंग्रज सरकारच्या मनात एक जरब निर्माण केली होती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप लोक लढत होते पण या तिघांनी केलेले योगदान कायम लक्षात राहिल.
मित्रांनो, क्रांतिकारक म्हटल्यावर काय मनात येते? कोणीतरी अशी व्यक्ति जिच्या मनात अन्यायाविरुद्ध संताप निर्माण होतो, मग ती अन्यायाविरोधात हिंसात्मक कारवाई करते, असंच ना? पण प्रत्यक्षात असे नाही. क्रांती ही विचारांनी होते. एकादोघांमुळे नाही तर पूर्ण समाज जेव्हा होणाÚया अन्यायाविरोधात पेटून उठतो, तेव्हा संपूर्ण समाज त्याविरोधात आवाज उठवतो आणि क्रांती घडवून आणतो.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे योगदान फक्त त्यांनी केलेल्या क्रांतिकारी कारवायांमध्ये नाही, तर त्यांच्या विचारांमध्ये आहे. आणि ते विचार समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे तसेच त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी समजून घेणेही महत्त्वाचे आहे. त्यावेळी आपल्या सर्वांना माहीत असल्याप्रमाणे ब्रिटीशांची जुलमी राजवट होती. एकीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, गांधीजीच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश सरकारशी समजुतीचे धोरण वापरून ब्रिटीश
सरकारच्या जुलमी राजवटीचे एक प्रकारे समर्थनच करत होते. काँग्रेसने कधीच पूर्ण स्वराज्याची मागणी केली नव्हती. मुळात तिचे नेते कधीच ब्रिटिश सरकारच्या खÚया अर्थाने विरोधात नव्हते.
भगतसिंह यांना क्रांतीची प्रेरणा कुठून बाहेरून मिळाली नाही तर ती त्यांच्या रक्तातच होती. भगतसिंह याचे वडील किशनसिंह, काका अजितसिंह यांची तुरुंगात छ्ळणुक करण्यात आली होती. त्यांच्या आजोबानी त्यांना सामाजिक जाणीव व जीवनाकडे बघण्याचा तर्कशुद्ध दृष्टीकोन दिला.
13 एप्रिल 1919 चे जालियनवाला बाग हत्याकांड, चौरीचौरा येथील घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले. यासारख्या घटनांमुळे संपूर्ण देशामध्ये एक तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी भगतसिंह लाहोरमधील नॅशनल कॉलेज मध्ये शिकत होते. त्यावेळी कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्र तसेच डिबेट्स आयोजित केल्या जायच्या. भगतसिंह त्या सर्व चर्चासत्रांत हिरीरीने सहभागी व्हायचे. ह्या सर्व विचारांनी प्रेरित होऊन भगतसिंहांनी आपले शिक्षण सोडून द्यायचा आणि पूर्ण वेळ भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी देण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी कानपुर हे क्रांतिकारकांचे केंद्रस्थान होते. कानपुर मध्ये येऊन त्यांनी प्रताप नावाचे क्रांतिकारी वृत्तपत्र सुरू केले. इथेच त्यांची बटूकेश्वर दत्त, शिव वर्मा आणि विजयकुमार सिन्हा यांच्याशी ओळख झाली. प्रताप, मतवाला, बलवंत, विद्रोही यांसारख्या नावांनी खूप लिहले. पण जनतेला एक क्रांतिच्या विचाराखाली आणण्यासाठी हे सर्व प्रयत्न अपुरे पडत होते. भारतीय जनतेवर अजुनही गांधीवादी विचारांचा पगडा होता.
आपले विचार जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी बटूकेश्वर दत्त यांच्या मदतीने विधान परिषदेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. त्या विधान परिषदेत जनताविरोधी ट्रेड डिस्प्युट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल पास होणार होते. या दोन्ही बिल्स ना भारतीय जनतेचा विरोध होता. बॉम्ब टाकण्याचा उद्देश जीवितहानी बिल्कुल नव्हता, तर जनतेचा विरोध सरकार पर्यंत पोहचवणे हा होता. म्हणूनच त्यांनी पळून न जाता आत्मसमर्पण केले.
याबाबत त्यांच्यावर खटला चालू करण्यात आला. कोर्टात सुनावणीच्या वेळी त्यांनी आपले विचार जनतेसमोर मांडले. इंकिलाबचे खरे महत्त्व दाखवून दिले. तसेच हा विचार मांडला की क्रांती हा केवळ बॉम्ब आणि बंदुकीचा पंथ नाही तर क्रांती ही विचारांच्या धारेने होते. त्यांनी हे दाखवून दिले की क्रांतीकारकांचे मूलभूत ध्येय हे साम्राज्यवाद संपवून या जगात शांतता प्रस्थापित करणे व एक शोषणमुक्त समाज निर्माण करणे, हेच आहे.
भगतसिंहांच्या समाजवादी विचारांचा परिचय आपल्याला या बॉम्बस्फोटाच्या खूप आधीपासून बघायला मिळतो. 1924 मध्ये हिन्दुस्थान रिपब्लिक असोसियशनची स्थापना करण्यात आली. तिच्या जाहीरनाम्यात असे स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे की माणसाचे माणसापासून होणारे सर्व प्रकारचे शोषण थांबवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. हीच संघटना पुढे 1929 मध्ये हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन म्हणून ओळखली जाऊ लागली.
भगतसिंह व त्यांच्या क्रांतीकारी सहकाÚयांनी ही संघटना उभारली. समाजवादाची स्थापना हेच या संघटनेचे मुख्य ध्येय होते. 1929 पर्यंत काँग्रेस फक्त आंशिक स्वराज्य (डोमिनियन स्टेटस) ची मागणी करत होता. पण हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशनने पूर्ण स्वराज्याची, शोषणरहित समाजाची मागणी पुढे ठेवली. काँग्रेसच्या 1928 च्या लाहोर अधिवेशनात त्यांनी तशी पत्रके वाटली. त्यामुळे काँग्रेसवर दबाव पडून त्यांना पूर्ण स्वराज्याची मागणी अधिवेशनात मांडावी लागली. अहमदाबाद कामगार चळवळ, बारडोली येथील शेतकÚयांच्या संघर्षाने कामगार व शेतकÚयांच्या चळवळीची ताकद देशाला दाखवून दिली. गांधीजींनी शेतकÚयांना व कामगारांना स्वातंत्र्य चळवळीपासून रोखायचा प्रयत्न केला. भगतसिंह यांच्या लक्षात आले की हा सगळा प्रयत्न भारतीय व इंग्रज भांडवलदारांचे हित राखण्यासाठी केला जात आहे.
लाहोर कॉन्स्पीरसी केसमध्ये भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या विरुद्ध किंग पंचम जॉर्ज विरुद्ध युद्ध पुकारल्याचा खटला भरण्यात आला. आणि या क्रांतीकारकांनी तो अभिमानाने कबूल केला. त्यांनी सांगितले की आमचे युद्ध तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत एका माणसाकडून दुसÚया माणसाचे शोषण थांबणार नाही. मग भले ते शोषण करणारे गोरे इंग्रज असोत वा काळे भारतीय.
मित्रांनो आज फक्त इतकंच सांगावस वाटत की शहीद दिवस केवळ एक परंपरा म्हणून साजरा न करता त्यांच्या विचारांचे आपण स्मरण करूया. कारण हे विचार फक्त त्या काळापुरते मर्यादित नाहीत तर खूप सारे विचार आजही लागू होतात. ते विचार समजून घेऊन त्या विचारांना समृद्ध बनवून त्यावर आधारित समाज बनवणे, हीच आजच्या काळाची गरज आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
– प्रथमेश