डोळयापुढती चित्र तरळते 57 च्या समराचे
होवुनी गेले वीर पराक्रमी करा स्मरण त्या शूरांचे – धृ
स्वातंत्र्याचा ध्यास लागला फास गळ्याला त्यापायी
सर्वस्वाचे हवन कराया नरनारींची चपळायी – 1
पराक्रमाची शर्थ जाहली खडे चारले चोरांना
शमले तेव्हा समर जरी हे धडकी बसली अांग्लांना – 2
मानप्रतिश्ठा वाटाघाटी तडजोडीचा प्रÜन नसे
ख्ड़्गाला परि खड्ग भिडतसे हीच कृती नच घात असे – 3
मंगल पांडे तात्या टोपे राणी लक्ष्मी नानांच्या
तलवारींचा खणखणाट तो अजुनही स्मरतो सर्वांच्या – 4
हायहाय ते गेले मेले मारित मारित शत्रूला
गेले ते म्हणूनच लाभला गौरव आपुल्या देशाला – 5
होम कुंड ते पेटविले त्या 57 च्या शूरांनी
उडी टाकली कुंडामध्ये त्या हास्यमुखाने कितिकांनी – 6
57 चे वीर हुतात्मे सागर ठरले स्फूर्तीचे
त्रैलोक्यामध्ये अमर जाहले भाग्यवंत ते कीर्तीचे – 7
करावयाला पुन्हा भले त्या आपल्या हिंदुस्थानाचे
डोळयापुढती चित्र तरळते 57 च्या समराचे – 8