परमार्थासाठी …..
लॉन्ग मार्च आहे हा …
इथल्या शोषित कष्टकऱ्यांचा ….
जगण्याच्या …..भाकरीच्या …
मीठ मिरचीच्या प्रश्नासाठी ….
जात …
धर्म ….
पंथ ….
अस्मितेने …
नाही ना पोट भरत …..
विठोबा नाही ना येत
पंढरी च्या बडव्याना सोडून
कष्टकर्यांच्या चुली पेटवायला ….
म्हणून …
आता आम्हीच निघालोत
तळपत्या सूर्याला अंगावर घेत ….
रक्ताळलेल्या पायांनी….
एसी विधान सभेच्या बाकांवर बसून
सत्तेच्या पुरणपोळ्यांवर
ताव मारणाऱ्या
सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला ….
महाराष्ट्राच्या विधानसभेला
घेराव घालायला …
आम्ही निघालोत …
तुम्हीपण या ….‼
डॉ .संजय दाभाडे …
पुणे …
९८२३५२९५०५