
यशाच्या उत्तुंग शिखराकडे आगेकूच करणारी
मी आशा, मी चेतना,
मी क्षमता, मी संवेदना,
आणि मी आसिफा सुद्धा!!
जग कसं आहे? काय आहे?
नुकतेच बघायला केलेली सुरुवात.
बहुतेक सारेच कळले मला,
केवळ आठ वर्षांच्या आयुष्यात.
फक्त शहानिशा करायची आहे,
म्हणून बरेच प्रश्न पडलेत मला,
कोणीतरी कधीतरी, उत्तरं देईल,
हीच अपेक्षा आहे माझ्या मनाला.
बघितलंय मी,
ह्या देशात कपिलेला दिलेले पूजनीय स्थान
अन् स्त्री शक्तीच्या सन्मानाचे केले जाणारे भाष्य पण.
तिचा धर्म कुठला? ह्यावरून ते ठरवणार.
मग स्त्री पूजनीय कशी? आहे कुठे तिचा सन्मान?
ह्या यक्ष प्रश्नांची उत्तरं हावियेत मला …
हे ही बघितलंय मी,
स्त्रियांवर होण्याच्या अत्याचारांचे देशभर उमटणारे पडसाद,
रस्त्यावर न्यायासाठी उतरणारी लोकं,
आणि त्यांच्यावर राज्याने केलेले आघात.
निर्भया ताई लक्षात आहे आणि तुम्ही सर्वही माहित आहात मला …
मात्र हे कधी थांबणार? कधी रोखले जाणार?
ह्याची उत्तरं हवी आहेत मला …..
हे तर तुम्ही ही बघितलंय, अनुभवलंय,
राज्याच्या छायेखाली रचले जात आहेत गुन्हेगारांचे ढीग
ह्याची validity ठरवणारे पापक्षालनाचे approval भरलेत शिगोशिग
काहीही केले ह्यांनी तरीही हे सुरक्षित
असा समाज बाळगणारे नराधम, आहे कुठे जखड ह्यांच्या भयंकर कृत्याला?
कधी मिळणार न्याय माझ्या अस्तित्वाला?
ह्याची उत्तरं हवी आहेत मला …
– निवेदिता