ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एड्युकेशन(AICTE) ने 2018-19 ह्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर 1:20 करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी हे गुणोत्तर 1:15 असे होते. हा निर्णय घेतल्यामुळे देशभरातील तंत्र महाविद्यालयांतील सुमारे दीड लाखांहून अधिक शिक्षकांना त्यांच्या नोकÚयांवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. महाराष्ट्र, तामीळनाडू, छत्तीसगड, तेलंगाणा आणि आंध्रपदेश या राज्यांमध्ये छाटणीची प्रकिया आधीच सुरू झाली आहे. सुमारे 765 शिक्षकांना काढून टाकल्याची माहिती ऑल इंडिया प्राइव्हेट कॉलेज एम्प्लॉईज युनियन(AIPCEU)ने दिली आहे.
हे गुणोत्तर नेमके काय असते. आणि त्यामुळे इतक्या नोकÚया कशा काय कमी होऊ शकतात हे जरा समजून घेऊया. जर समजा एखाद्या महाविद्यालयांत 15000 विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर 1:15 गुणोत्तराप्रमाणे 1000 शिक्षकांची आवश्यकता असेल. आता जर हेच गुणोत्तर 1:20 केले तर 15000 विद्यार्थ्यांसाठी फक्त 750 शिक्षक पुरेसे ठरतील. ह्याचाच अर्थ असा की महाविद्यालयांच्या संचालकांना 25 टक्के शिक्षकांना कामावरून कमी करण्याचे कारण मिळाले आहे. आज AICTE च्या वेबसाईट नुसार 2017-18 च्या शैक्षणिक वर्षात AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयांत काम करणाÚया प्राध्यापकांची संख्या सुमारे 7,00,000 च्या आसपास होती. नवीन गुणोत्तराप्रमाणे ही संख्या 5,25,000 वर आणण्यात येईल. ह्याचाच अर्थ 1,75,000 लाख शिक्षकांना काढून टाकण्यात येईल.
बहुतेक शिक्षकांच्या नोकरीवर तर गदा येईलच पण त्याचबरोबर ज्यांची नोकरी टिकून राहील अशा शिक्षकांवर कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. बÚयाच महाविद्यालयांत शिकवण्याबरोबरच इतर कारकुनी कामे, समाजकल्याणाची कामे शिक्षकांना करावी लागतात. आता शिक्षकांच्या छाटणीमुळे इतर शिक्षकांवरील कामांच्या जबाबदाÚया वाढणार आहेत.
फक्त शिक्षकांवरच नव्हे तर विद्यार्थ्यांवरही ह्या निर्णयाचा भयानक परिणाम होणार आहे. आधी हे गुणोत्तर 1:15 होते. म्हणजे समजा एका वर्गात जर सहा विषय शिकवले जात असतील तर सहा शिक्षक त्या वर्गात शिकवत असतील. ह्याचाच अर्थ की एका शिक्षकाला 90 विद्यार्थ्यांच्या वर्गात शिकवावे लागत होते. आता जर हे गुणोत्तर 1:20 इतके केले तर त्याच शिक्षकाला 120 विद्यार्थ्यांच्या वर्गात शिकवावे लागणार आहे. जेव्हा 90 विद्यार्थ्यांचा वर्ग असायचा तेव्हाच प्रत्येकाला सामावून घेऊन शिकवणे अवघड होऊन बसते. मग शिकवणे म्हणजे एकाच दिशेने झालेला संवाद बनतो. आपण शिकवलेले सर्व मुलांना समजले की नाही हे समजणे कठीण होऊन बसते. एकूणच शिक्षणाचा दर्जा ह्यामुळे खालावला जात आहे. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर जितके कमी असेल तितके चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकते.
दुसरे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकांना काढून टाकल्यामुळे महाविद्यालय संचालक संस्थांद्वारे त्यांच्या पगारावर होणारा खर्च कमी होणार आहे. खर्च कमी झाल्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की विद्यार्थ्यांच्या फी आकारणी मध्ये कपात होईल तर तुमचा साफ गैरसमज आहे. तंत्र शिक्षणाची फी कमी करण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही म्हणूनच ह्या निर्णयाचा फायदा मात्र महाविद्यालये चालविणाÚया धनिकांनाच होणार आहे. शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचा हा अजून एक प्रकार आहे.
विविध शिक्षक संघटना शिक्षकविरोधी आणि विद्यार्थीविरोधी निर्णयाविरुद्ध आवाज उठवीत आहेत. ज्यांची नोकरी गेली त्यांसोबतच ज्यांची नोकरी आज टिकून आहे त्या प्राध्यापकांनीदेखील ह्या निर्णयाचा विरोध करायला हवा, कारण कमी शिक्षकसंख्येमुळे कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनी पण ह्या संघर्षात उतरायला हवे कारण हा प्रश्न फक्त शिक्षकांचा नाही तर सगळ्याच विद्यार्थ्यांना निर्णयाचा फटका बसणार आहे. शिक्षक विद्यार्थी आणि पालक एकत्र आले तरच हा निर्णय मागे घेण्यासाठी AICTE वर दबाव आणला जावू शकतो.
स्पार्कः वॉईस ऑफ यूथ AICTE ने घेतलेल्या निर्णयाचा कडाडून निषेध करते. हा निर्णय शिक्षकविरोधी, विद्यार्थीविरोधी तसेच शिक्षणाचा दर्जा खालाविणारा निर्णय आहे त्यामुळे तो मागे घेण्यात यावा अशी मागणी स्पार्क करते. स्पार्क संपूर्ण देशातील तंत्रशिक्षण घेणाÚया तमाम विद्यार्थ्यांना आवाहन करते की त्यांनी प्राध्यापकांच्या बरोबरीने संघर्ष करुन गुणोत्तर पूर्ववत आणण्यासाठीचे आंदोलन तीव्र करावे!