वर्षानुवर्ष राब-राब राबतोय,
एका विशिष्ठ कारणासाठी.
उत्पादनासाठी कायम मेहनत करतोय
पुरेसे अन्न मिळावे म्हणून देशासाठी.
एकाच ध्येयाकडे लक्ष्य ठेवतोय,
सर्व लोकांची भूक भागवण्याकडे.
राष्ट्र भूकेपासून व्हावे मुक्त!
मात्र अद्यापही केवळ शेतकऱ्याचे जीवन पराधीन आहे.
मी केवळ मरण्यासाठीच बनलोय
आणि ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्ये’ च्या संख्येत गुरफटलोय.
या संख्यांच्या खेळात
माझं मरण केवळ कवडीमोल झालंय.
माझा समाजातील सहभाग तोलला जातोय पैशांच्या आकड्यांनी;
माझं आयुष्य झालय मातीमोल जीडीपी संख्यांपुढे.
सावत्र मुलासारखी वागणूक झेलावी लागतेय,
जरी मी माझा आवाज उठवला प्रत्येक ठिकाणी.
महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश किंवा तामिळ नाडू –
प्रत्येक पायरीवर लढतोय,
स्वस्तदर कर्जापासून ते स्वस्त कृषी सामग्री पर्यंत,
बाजारात आणण्यापासून ते रास्त हमीभावापर्यंत
माझा लढा निरंतर चालूच आहे.
मी केवळ एक ‘घोषणा’ म्हणून उरलोय
‘जय किसान’ आणि ‘अन्नदाता’ ह्या नावाखाली.
मात्र वास्तवात मला वागवलं जातंय
केवळ ‘आत्महत्येची कथा’ म्हणून…